Recherche FR menu Portail client du Groupe BEI
Recherche
Résultats
5 premiers résultats de la recherche Voir tous les résultats Recherche avancée
Recherches les plus fréquentes
Pages les plus visitées

भारत: EIB ग्लोबलने नागपूर आणि पुण्यासाठी €289.5 दशलक्षचा वित्तपुरवठा करून शाश्वत मेट्रो वाहतुकीसाठी भक्कम पाठिंबा दिला आहे.

15 October 2025
EIB
  • नागपूर मेट्रोच्या विस्तारासाठी240 दशलक्षचे कर्ज आणि पुणे मेट्रोसाठी49.5 दशलक्षचा अतिरिक्त निधी
  • प्रदूषण कमी करण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी आणि लाखो शहरी रहिवाशांना सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम प्रवास प्रदान करण्यासाठी प्रकल्प
  • भारती वाहतूक क्षेत्रात EIB वित्तपुरवठा आता €3.6 अब्जपेक्षा जास्त झाला आहे, ज्यामुळे युरोपबाहेर EIB वाहतूक समर्थनाचा आपला देश सर्वात मोठा लाभार्थी ठरला आहे.

युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) ने त्याची विकास शाखा EIB ग्लोबलद्वारे, भारतातील शाश्वत मेट्रो नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी एकूण €289.5 दशलक्ष इतका नवीन अर्थपुरवठा जाहीर केला आहे. या अर्थपुरवठा पॅकेजमध्ये नागपूर मेट्रो विस्तारासाठी €240 दशलक्ष कर्ज आणि पुणे मेट्रोसाठी €49.5 दशलक्षचे अतिरिक्त कर्ज समाविष्ट आहे, ज्यामुळे जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या आपल्या देशात हरित, सुरक्षित आणि समावेशक शहरी वाहतुकीसाठी EIB च्या वचनबद्धतेला आणखी बळकटी मिळणार आहे.

या दोन्ही प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे प्रवाशांच्या वाहतूकीचा ओघ रस्त्यांवरील वाहतुकीपासून अधिक शाश्वत मेट्रो प्रणालींकडे वळेल आणि शहरी गतिशीलता लक्षणीयरीत्या वाढेल अशी अपेक्षा आहे. या मॉडेल बदलामुळे कार्बन उत्सर्जन आणि शहरी वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल, तसेच रस्ते वाहतूक अपघात आणि ध्वनी प्रदूषण देखील कमी होईल. शिवाय, यामुळे प्रवासाला लागणारा वेळ आणि खर्च देखील कमी होईल, ज्यामुळे शहरांमध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होईल.

नागपूरमध्ये, नवीन मेट्रोचा विस्तार पूर्णपणे कार्यान्वित झाल्यास शहरी वाहतूक क्षेत्रामधल्या CO₂ उत्सर्जनात 22% घट होण्याची अपेक्षा आहे. 2041 पर्यंत, मेट्रोमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अंदाजे 190,000 पर्यंत पोहोचेल जी सध्याच्या आकड्यांच्या तुलनेत 75% वाढ दर्शवते. मेट्रो नेटवर्कच्या विस्तारामुळे ही वाढ होईल, जी लांबीने दुपटीपेक्षा जास्त होईल आणि त्याचे सेवा क्षेत्रही लक्षणीयरीत्या वाढेल ज्यामुळे रहिवाशांसाठी संपर्कता आणि सुलभता वाढेल.

पुण्यात अतिरिक्त वित्तसहाय्य EIB च्या मागील €600 दशलक्ष गुंतवणुकीला पूरक ठरेल, ज्यामध्ये एकूण 31.25 किमी लांबीच्या दोन मेट्रो लाईन्स, 30 स्थानके आणि 102 आधुनिक मेट्रो कार्सचे बांधकाम समाविष्ट आहे. पुणे मेट्रोने मार्च 2022 पासून 10 कोटी प्रवाशांची यशस्वीरित्या वाहतूक केली आहे आणि खाजगी वाहनांना एक विश्वासार्ह, पर्यावरणपूरक पर्याय प्रदान केले आहे. या सोयीमुळे गर्दी आणि प्रदूषण कमी होते आणि विशेषतः महिला आणि तरुण प्रवाशांसाठी सुरक्षितता आणि उपलब्धता सुधारते.

हे कामकाज EU च्या ग्लोबल गेटवे स्ट्रॅटेजीला हातभार लावतात, जी आर्थिक वाढ, हवामान कृती आणि सुधारित शहरी राहणीमानाची प्रेरक शक्ती म्हणून शाश्वत वाहतुकीला प्राधान्य देते.

"नागपूर आणि पुण्यात आधुनिक आणि शाश्वत मेट्रो सिस्टीमचा विकास हा भारताच्या हरित शहरे आणि सर्वसमावेशक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक मोठे पाऊल आहे. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या भक्कम पाठिंब्याने, हे प्रकल्प गर्दी आणि उत्सर्जन कमी करतील, गतिशीलता सुधारतील आणि लाखो लोकांचे जीवनमान उंचावेल. भारताच्या शाश्वत शहरी भविष्यासाठी EIB च्या सततच्या वचनबद्धतेचे आम्ही कौतुक करतो,” असे भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारा म्हणाल्या.

"नागपूरच्या मेट्रोचा विस्तार करून आणि पुण्याच्या नेटवर्कला आणखी पाठिंबा देऊन आम्ही लाखो लोकांना स्वच्छ हवा, सुरक्षित प्रवास आणि जलद संपर्क प्रदान करण्यास मदत करत आहोत. भारताच्या हरित संक्रमण आणि हवामान उद्दिष्टांना पाठिंबा देताना युरोपियन वित्तपुरवठा लोकांच्या दैनंदिन जीवनावर कसा थेट परिणाम करू शकतो हे या प्रकल्पांवरून दिसून येते. 2016 पासून €3.6 अब्जपेक्षा जास्त गुंतवणुकीसह, EU च्या ग्लोबल गेटवे धोरणाअंतर्गत भारत युरोपबाहेर आमचा सर्वात मोठा वाहतूक भागीदार राहिला आहे," EIB च्या उपाध्यक्षा निकोला बीअर म्हणाल्या.

पार्श्वभूमीबद्दलची माहिती

EIB ग्लोबल बद्दल:

युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (ElB) ही सदस्य राष्ट्रांच्या मालकीची युरोपियन युनियनची दीर्घकालीन कर्ज देणारी संस्था आहे. ती EU धोरण उद्दिष्टांचा पाठपुरावा करणाऱ्या गुंतवणुकीला वित्तपुरवठा करते.

EIB ग्लोबल ही EIB ग्रुपची आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि विकास वित्तपुरवठा यांचा प्रभाव वाढवण्यासाठी समर्पित विशेष शाखा आहे आणि ग्लोबल गेटवेची एक प्रमुख भागीदार आहे. 2027 च्या अखेरीस या EU उपक्रमाच्या एकूण उद्दिष्टाच्या एक तृतीयांश एवढ्या गुंतवणुकीला पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट आहे. टीम युरोप मध्ये EIB ग्लोबल सहकारी विकास वित्त संस्था आणि नागरी समाजासोबत मजबूत, केंद्रित भागीदारी वाढवते. EIB ग्लोबल जगभरातील त्यांच्या कार्यालयांद्वारे EIB ग्रुपला लोक, कंपनी आणि संस्थांच्या जवळ आणते. मीडियाच्या वापराकरीता EIB मुख्यालयाचे फोटो येथे उपलब्ध आहेत. http://twitter.com/EIB https://www.linkedin.com/company/eib-global/

भारती EIB ग्लोबलबद्दल:

EIB ही जगातील सर्वात मोठी बहुपक्षीय सार्वजनिक बँक आहे. 2024 मध्ये त्यांनी युरोपियन युनियनच्या बाहेरील क्रियाकलापांसाठी 2024 मध्ये स्थापन झालेल्या EIB ची शाखा EIB ग्लोबलद्वारे युरोपियन युनियनच्या बाहेर सुमारे €8.4 अब्ज गुंतवणुकीसाठी वित्तपुरवठा केला. 1993 मध्ये भारतात त्यांचे कामकाज सुरू झाल्यापासून, EIB ने देशातील 100 हून अधिक प्रकल्पांना पाठिंबा दिला आहे ज्यामध्ये वाहतूक आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये तसेच भारतातील लघु आणि मध्यम उद्योग आणि मिड-कॅप्समध्ये €5.6 अब्ज गुंतवणूक केली आहे.

ग्लोबल गेटवे इन्व्हेस्टमेंट अजेंडा:

युरोपियन युनियनच्या ग्लोबल गेटवे इन्व्हेस्टमेंट अजेंडाच्या अंमलबजावणीमध्ये EIB ग्लोबल हा एक महत्त्वाचा भागीदार आहे, जो डिजिटल, हवामान, वाहतूक, आरोग्य, ऊर्जा आणि शिक्षण क्षेत्रात जागतिक आणि प्रादेशिक संपर्कता सुधारण्यासाठी चांगल्या प्रकल्पांना पाठिंबा देतो. बँकेच्या या क्षेत्रातील 65 वर्षांच्या अनुभवावर आधारित EIB ग्लोबल जे काही करते त्याचे केंद्रबिंदू संपर्कतेमध्ये गुंतवणूक करणे आहे. आमच्या भागीदार सहकारी EU संस्था आणि सदस्य राष्ट्रांसह, 2027 च्या अखेरीस भारत आणि आशियासह, €100 अब्ज गुंतवणुकीला (उपक्रमाच्या एकूण बजेटच्या सुमारे एक तृतीयांश) पाठिंबा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

Contact

Référence

2025-390-MR

Partager